पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्सिजन टॅंक लिक

पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्सिजन टॅंक लिक

Published by :
Published on

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक लिक झाल्याने खळबळ उडाली होती. सुदैवाने दुसरा टॅंक भरलेला असल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे. टॅन्कमध्ये टँकरद्वारे ऑक्सिजन भरताना हा गॅस लिक झाला होता. सायंकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. तातडीने प्रशासनाच्या लक्षात ही बाब येताच, दुसऱ्या टॅंकमधील ऑक्सिजन पाईपलाईन द्वारे रुग्णांना पुरविण्यात आले. त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळातच लिकेज बंद झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com