उत्तर प्रदेशात हल्ला होऊन सुद्धा पुणे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

उत्तर प्रदेशात हल्ला होऊन सुद्धा पुणे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Published by :
Published on

उत्तरप्रदेशात खुनाच्या घटनेतील आरोपीला अटक करण्यास गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यानंतरही पुणे पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक गाझियाबाद येथे गेले होते. यावेळी स्थानिक पोलीस देखील पुणे पोलिसांसोबत होते. आरोपी एका गल्लीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेले असता पाच ते सहा जणांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड करत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अखेर खुनातील आरोपीला अटक करत इतर हल्लेखोरांना ताब्यात घेतले अशी माहिती फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे लांडगे यांनी सांगितले.दरम्यान, गाझियाबाद पोलिसांना घटनास्थळावरुन सहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com