फुकट रेल्वे प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, 54 हजार प्रवाशांकडून दंड वसूल

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाचा दणका
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्रात अनेकदा अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना दिसतात. यामुळे खुप वेळा रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील सहन करावे लागते. काही वेळा प्रवाशांची तपासणीदेखील केली जाते. मात्र आजही अनेक ठिकाणी प्रवासी तिकीटाशिवाय प्रवास करतात. आशा फुकट रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर येथील महत्त्वाच्या स्थानकांमध्ये व रेल्वे गाडीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासन विभागाकडून पथकांची नेमणूकदेखील आहे. आतापर्यंत 54 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक सामान घेऊन जात असलेल्या प्रवाशांवरदेखील कारवाई केली आहे. त्यामुळे आता विनाटिकीत रेल्वे प्रवास करणाऱ्यांना चाप बसेल असे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com