बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा! घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा! घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Published by :

शिरूर : प्रमोद लाडे | पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी पिस्तुलीचा धाक दाखवत बँकेतून कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

दरोडेखोर 25-30 वयोगटातील असल्याचं बोललं जात आहे. 5-6 दरोडेखोरांनी निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट हे सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडी पुढील बाजूस प्रेस असे लिहिलेले आहे. या दरोड्यात प्राथमिक माहितीनुसार, अंदाजे सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व 31 लाख रुपये रोख असा दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com