पुणेकरांना दिलासा, चंद्रकांत पाटलांनी केली मोठी घोषणा; पुढील 10 दिवस...

पुणेकरांना दिलासा, चंद्रकांत पाटलांनी केली मोठी घोषणा; पुढील 10 दिवस...

वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या पुणेकरांसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
Published on

अमोल धर्माधिकारी | पुणे : वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या पुणेकरांसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांकडून आता पुढील दहा दिवस कुठलाही दंड आकारण्यात येणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असताना नियमांच उल्लंघन केल्यामुळे दंड द्यावा लागत होता. मात्र, या कारवाईमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून पोलिसांना वाहतुकीवर नियत्रंण मिळवण्यात अडचण येत होती. त्यामुळे पुढील दहा दिवस पोलिसांकडून कुठलाही दंड आकारण्यात येणार नाही. तसेच, वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी रस्त्यावर तैनात करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज झाली. यामध्ये पाटलांनी ही घोषणा केली.

तसेच, बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी घटक कार्यक्रम २०२२-२३ मधील सप्टेंबर २०२२ अखेर झालेल्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कामांना दिलेली स्थगिती नियोजन विभागाने उठवली असून फेरआढावा घेतल्यानंतर १ नोव्हेंबरपर्यंत विकासकामे ठरवली जाणार आहेत.

दरम्यान, दिवाळी सण काही दिवसांवर आला आहे. या सणांच्या खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, मंडई परिसर, तुळशीबाग, बाजीराव रस्ता, बोहरी आळी या परिसरात गर्दी करत असतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. गर्दी टाळण्यासाठी वाहनचालक नो-एन्ट्रीतून शिरले आणि संपूर्ण रस्ते ब्लॉक झाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com