लालबागच्या राजाच्या दरबारात पत्रकारांना धक्काबुक्की

लालबागच्या राजाच्या दरबारात पत्रकारांना धक्काबुक्की

Published by :

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमन होईल. असे असतानाच लालबागच्या दरबारात पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुकी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लालबागचा राजा मंडपामध्ये कधी कार्यकर्त्यांची तर कधी पोलिसांची अरेरावी या परिसरात पाहायला मिळते. आता तर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी तर एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी केली. स्वत: मास्क न घालता संजय निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. मीडियाकर्मींनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांना प्रेमाने,समजुतीने बोलण्यासं सांगितलं,. त्यावेळी त्यांना पारा चढलेला दिसला.

धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा केली. पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायदा राखणाऱ्यांनी अरेरावी केली तर विचारायचं कुणाला हा प्रश्न सर्वसामान्यांना आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com