Hingoli : हिंगोलीत नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Hingoli) हिंगोली जिल्ह्यात नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे पाहायला मिळत असून हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी करण्यासाठी शासकीय हमीभाव केंद्र सुरू झाले आहेत.
नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमीभाव केंद्रामध्ये 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात नाफेडची नोंदणी केली आहे.
खुल्या बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे सेनगाव नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून शेतकऱ्यांना आपली सोयाबीन विक्री करण्यासाठी रात्र जागून काढावी लागत असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
हिंगोलीत नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा
नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी 2 दिवसांपासून मुक्कामी
5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीनला हमीभाव
