Thane
Thane

Thane : ठाण्यात तुफान राडा, मिनाक्षी शिंदे - भूषण भोईरांचे कार्यकर्ते भिडले

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Thane) महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये काल मतदान पार पडलं.

अनेक ठिकाणी मोठा गोंधळ, राडा पाहायला मिळाला. यातच काल ठाण्यात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांचे समर्थक भिडल्याची माहिती मिळत आहे. ठाण्यातील मानपाडा परिसरात प्रभाग क्रमांक ३ मध्ये हा राडा झाल्याची माहिती मिळत असून ईव्हीएम मशीन पळवून नेण्यावरून हा राडा झाला असून दोन्ही उमेदवारांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी भूषण भोईर यांनी बाहेरून लोकं आणि हत्यारे आणून जीवे मारण्याचा कट होता असा आरोप केला तर मीनाक्षी शिंदे समर्थकांकडून भूषण भोईर यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली असल्याचा आरोप भूषण भोईर यांच्या समर्थकांकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • ठाण्यात तुफान राडा

  • मिनाक्षी शिंदे-भोईरांचे कार्यकर्ते भिडले

  • पोलिसांकडून लाठीचार्ज

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com