Sujay Vikhe; 'साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा' सुजय विखेंच्या विधानावर राधाकृष्ण विखेंचं स्पष्टीकरण

Sujay Vikhe; 'साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा' सुजय विखेंच्या विधानावर राधाकृष्ण विखेंचं स्पष्टीकरण

साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करण्याच्या सुजय विखे यांच्या विधानावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले स्पष्टीकरण, जाणून घ्या सविस्तर.
Published by :
shweta walge
Published on

साई संस्थांनी मोफत भोजन न देऊन त्याचे पैसे आकारावेत, असे विधान माजी खासदार सुजय विखे यांनी केले होते. त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत प्रसादावर पैसे आकारू नयेत, त्याऐवजी त्यांना मोफत भोजन दिले पाहिजे. मात्र सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याच राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला. भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील. हे मी मान्य करतो. मात्र भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते सुजय विखे पाटील?

साई संस्थानच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय. महाराष्टातील सगळे भिकारी इथे गोळा झाले आहेत. हे योग्य नाही. या विरोधात आंदोलनाची वेळ आली तर आम्ही आंदोलन करू. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आलं. मात्र तिथे चांगले शिक्षक नाहीत. इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही. इंग्लिश विषयाचा शिक्षक मराठीत इंग्लिश शिकवतोय. याचा काय उपयोग?” अस ते म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com