कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांची यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली असून प्रशासकीय निवडीची औपचारिकता बाकी आहे.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले नव्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होणाऱ्या सदस्यांनी आठ महिन्यात चांगलं काम करून दाखवावे व तसेच भरपूर विकास कामे करावीत असं म्हटलं आहे तसंच सतेज पाटील म्हणाले कि, विरोधकांना देखील मी आवाहन करतो कि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी आपण सहकार्य करावं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक असल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा होण्यास कोणतीही अडचण नाही मात्र विरोधकांनी देखील सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.