Shahajibapu Patil : शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Shahajibapu Patil ) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाची भरारी पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली. सांगोल्यात शहाजीबापू पाटलांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयात दाखल झाले.
सांगोल्यात शिंदे गटाची मोठी सभा पार पडली. या सभेनंतर शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. या कारवाई झाल्याने शिंदे गटाचे स्थानिक कार्यकर्तें चांगलेच नाराज झाले आहेत.
झाडाझडतीच्यावेळी ऑफीसमधल्या सर्वांनाच थांबवून घेतलं होते. यामुळे आता शिवसेना-भाजप वाद आणखी चिघळणार असल्याची शक्यता आहे. छापेमारीत काय सापडलं, काही जप्त करण्यात आले का, याची माहिती समोर आली नाही.
Summery
शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रात्री छापे
भरारी पथकाने धाड टाकून झाडाझडती घेतली
झाडाझडती घेतल्यानं शिवसेना कार्यकर्ते संतप्त
