गणेशोत्सवासाठी रायगडात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा; लस किंवा चाचणीची सक्ती नाही
भारत गोरेगावकर | गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात येताना त्यांना कोविड प्रतिबंधक लशीचे डोस घेणे सक्तीचे नाही. तसेच त्यांना कोविडची आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणी देखील बंधनकारक असणार नसल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मात्र आपल्या कुटुंबाच्या काळजीपोटी नागरीकांनी लशींच्या डोसचे प्रमाणपत्र व आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणीचे रिपोर्ट सोबत नागरीकांनी बाळगावे असे आवाहन केले.
आदिती तटकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाचा गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांना कोविड प्रतिबंधक लशीचे डोस घेणे सक्तीचे नाही. तसेच त्यांना कोविडची आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणी देखील बंधनकारक असणार नसल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांवर बंधने नसली तरी जिल्ह्यात येणाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेऊन यावेत तसेच कोविडची चाचणी करून यावे असे आवाहन तटकरे यांनी केलं आहे. यासंदर्भात आगामी काळात शासनाकडून काही मार्गदर्शक सूचना आल्या तर त्याचे सर्वांना पालन करावे लागेल असही त्यांनी सांगितलं.रायगड जिल्ह्यात कोविड चे निर्बंध अजूनही कायम असल्याची आठवण त्यांनी करून दिली.