Ashwini Vaishnaw: 'मुंबईतील लोकल वाढवा' रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सूचना

Ashwini Vaishnaw: 'मुंबईतील लोकल वाढवा' रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सूचना

मुंबईत पावसाचा जोर वाढत असून, या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला.

मुंबईत पावसाचा जोर वाढत असून, या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील पायाभूत सुविधांच्या कामांच्या योजनांचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच भविष्यात मुंबईतील लोकल फेऱ्या वाढविण्याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.

नुकताच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पश्चिम आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, अधिकारी यांची बैठक पार पडली. या वेळी त्यांनी मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला.

यामध्ये नाल्यांची पाहणी, मायक्रो टनेल, ड्रोन तैनाती, रिमोट कंट्रोल्ड फ्लोटिंग कॅमेरे, नवीन नाले बांधणे, कल्व्हर्ट या कामांबाबत चर्चा केली. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी भविष्यात लोकल फेऱ्या वाढवण्याबाबत, तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या चालवण्याबाबत चर्चा केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com