लाचलुचपत विभागाची कारवाई; रेल्वे पोलीस उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना अटक
अनिल ठाकरे, चंद्रपूर | चंद्रपूरमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना रंगेहाथ अटक करण्याच आली आहे. नागपूर येथील केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी यांनी लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली.
भद्रावती येथील संचालकाने एका प्रवाशाला बनावट आयडीने रेल्वेचे तिकीट काढून दिले होते, ही माहिती रेल्वे पोलिसांना कळली व तात्काळ त्यांनी त्या सायबर कॅफेवर कारवाई केली. सायबर कॅफेच्या संचालकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक गोपिका मानकर यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 60 हजार रुपये देण्याचे ठरले. सापळा रचून वरोरा रेल्वे स्थानकावर रात्रीच्या सुमारास 60 हजार रुपयाची लाच घेताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई नागपूर येथील केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी यांनी केली.