मनमाडवरून रद्द झालेल्या प्रवासी गाड्या सुरळीत

मनमाडवरून रद्द झालेल्या प्रवासी गाड्या सुरळीत

Published by :
Published on

पाऊस आणि भूस्खलनामुळे रद्द झालेल्या सर्व प्रवासी गाड्या सुरळीत झाल्या आहेत. मुंबईत झालेल्या पावसामुळे प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व मध्य रेल्वेच्या कसारा घाटात दरड कोसळली होती. तर, उंबरमाळी स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेल्याने वाहतूक देखील ठप्प झाली होती. अखेर मनमाड – मुंबई रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेससह उत्तर भारतातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशी गाड्या सुरळीत सुरू आहे. सर्व प्रवाशी गाड्या वेळेत धावत आहे. मुंबईकडून येणाऱ्या गाड्याही वेळेत सुरू असल्याने प्रवाश्यांना चांगला दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com