Video : मुंबईत पावसाच्या सरी, यंदा मान्सूनही लवकर
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील (North India) बहुतांश राज्यांच्या तापमानात घट झाली असली तरी अजूनही वातावरण उष्णच आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये पावसामुळे लोकांना दिलासा मिळाला असून आता इतर राज्यातील लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच शनिवारी मुंबईत अनेक भागांत पावसाच्या सरी पडल्या. यामुळे वातावरणाात गारवा निर्माण झाला.
मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मुंबईच्या कुलाबा, काळबादेवी, मुंबई महानगरपालिका परिसर व इतर आणखी काही ठिकाणी पाऊस झाला.
मान्सून पावसाच्या आगमनाचा चार्ट जारी
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर ( K. S. Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएमडीने चार आठवड्यांचा मान्सून पावसाच्या आगमनाचा चार्ट जारी केला आहे, त्यानुसार मुंबई आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील इतर भागात ३ ते ९ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होईल.