Rain Update : मुंबई आणि रायगडला आज 'रेड अलर्ट' जारी
(Rain Update ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई आणि रायगडला आज भारतीय हवामान खात्याने 'रेड अलर्ट' जारी केला आहे.रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले असून आज राज्यभरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत असून मुंबई आणि ठाण्यात गोविंदा मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.ठाणे जिल्ह्याला ओरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे गरज नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.