Rain Update
महाराष्ट्र
Rain Update : पुढील 3 ते 4 तास महत्वाचे, 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहण्याचा अंदाज; राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
( Rain Update ) गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
आजही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पाणी साचलं आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
याच पार्श्वभूमीवर पुढील 3-4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील 3 ते 4 तासांत काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.