राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. राज्यातील काही भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी
Published by :
Team Lokshahi

मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसातील पावसाच्या खंडानंतर विदर्भात ५ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ७ व ८ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची अंदाज आहे. तर, ९ ते ११ ऑगस्ट रोजी विदर्भात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता असून मुसळधार पावसाचाही अंदाज दिला आहे. ७ व ८ ऑगस्टला अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे पुरस्थितीजन्य स्थिती उत्पन्न होऊ शकते. हे लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मागील दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. तर नदी, नालेही तुडुंब भरुन वाहत आहे. परंतु, मुसळधार पावसामुळे पिके वाहून गेली असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com