Raj Thackeray : 'तू आम्हाला पटक पटके मारणार? दुबेला मी सांगतो, दुबे ...';राज ठाकरेंचं निशिकांत दुबेंना खुलं आव्हान
(Raj Thackeray) मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका दुकानदाराला मारहाण केली होती. यानंतर 3 तारखेला परिसरातील व्यापाऱ्यांनी याच्या निषेधार्थ मोर्चा काढला.यात जय मारवाडी, जय गुजराती अशा घोषणा देखील देण्यात आल्या. या घटनेमुळे चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावरुन मिरा रोडमध्ये 8 जुलैला मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर काल पहिल्यांदाच राज ठाकरे यांची मिरा रोडमध्ये सभा झाली.
यावेळी राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान दिलं आहे. “जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा.आपल्या घरात तर कुत्रादेखील वाघ असतो. अशी पोस्ट दुबे यांनी एक्सवर शेअर केली होती. “मराठी लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर यावं, त्यांना आपटून आपटून मारू,” असे त्यांनी म्हटले होते.
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबेंना जाीहर आव्हान दिलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, "दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु. त्याच्यावर केस झाली का? तू आम्हाला पटक पटके मारणार? दुबेला मी सांगतो,दुबे तुम मुंबई में आ जावो. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे...", असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलंय.