Raj Thackeray : "भारतीय जनता पक्षाला आज जे काही मतदान होतंय ते फक्त नरेंद्र मोदींच्याच नावावर"
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Raj Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅली, मुलाखतींचे आयोजन करण्यात येत आहे. यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत संजय राऊत यांनी विचारले की, "मधल्या काळात आपण एक महत्त्वाचं विधान केलं होतं, की भाजपला मोदींची आणि पैशांची मस्ती आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, "त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. लहानपणी आपण सगळे पत्त्यांचा बंगला करायचो.. यांच्याकडेसुद्धा बघितलं तर पत्त्यांचा बंगला आहे पण तो उलटा आहे."
"खालचा पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे आणि आता हे जे सगळे बोलताहेत ते केवळ नरेंद्र मोदींच्या जिवावर बोलताहेत. भारतीय जनता पक्षाला आज जे काही मतदान होतंय ते फक्त नरेंद्र मोदींच्याच नावावर होतंय. यांच्या कोणाच्याही नावावर होत नाही" असे राज ठाकरे म्हणाले.
Summary
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रसिद्ध
या मुलाखतीत राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे
"भारतीय जनता पक्षाला आज जे काही मतदान होतंय ते फक्त नरेंद्र मोदींच्याच नावावर"
