Raj Thackeray : "50 खोके हा विनोदाचा भाग नाही, पन्नास खोके म्हणजे..."; राज ठाकरेंनी सरळ आकडाच सांगितला...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Raj Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅली, मुलाखतींचे आयोजन करण्यात येत आहे. यातच आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत आज प्रसिद्ध झाली.
दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी सवाल विचारला की, "भाजपने आरोप केला आहे की, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचारा झाला. महापालिकेत एवढे पैसे असतात आणि एवढे पैसे असतील तर मग हे आमदार 50 कोटींना का पळून गेले?"
यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, "मला त्या गोष्टीबद्दल जरा बोलायचे आहे. जे चालू होते ना, 50 खोके, 50 खोके. मला वाटतं लोकांना नीट समजावून सांगणं आवश्यक आहे. 50 खोके, 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 40 आमदार म्हणजे 2 हजार कोटी रुपये झाले. हे पैसे कुठून आले? कसे आले. बँकेतून लोन तर नव्हते ना घेतले. त्यामुळे कुठल्या भ्रष्टाचारावर कुणी काय बोलावे." असे राज ठाकरे म्हणाले.
