Raj Thackeray - Uddhav Thackeray
महाराष्ट्र
Raj Thackeray - Uddhav Thackeray : हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात गणेश मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ, दहीहंडी पथकांना सहभागी होण्याचं आवाहन
राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
(Uddhav Thackeray - Raj Thackeray ) राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. 5 जुलै रोजी मुंबईत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून विविध मंडळांना आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील दहीहंडी पथक, गणेश मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ अशा विविध मंडळांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आज संध्याकाळी विभाग रचनेनुसार विविध मंडळांसोबत मुंबईत मनसेकडून बैठका जाणार आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात देखील वरळी येथे मंडळांसोबत या बैठक होणार आहेत.