Raj Thackeray : राज ठाकरे आज मनसेच्या शाखांना देणार भेटी; शाखा नेटवर्किंग स्ट्राँग करण्याकडे ठाकरेंचा कल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Raj Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मनसेच्या शाखांना भेट देणार आहे.
राज ठाकरे आज विलेपार्लेपासून दहिसरपर्यंत शाखांना भेटी देणार आहेत. मनसेच्या शाखांना भेट देत विविध कार्यालयांचे उद्घाटन या दौऱ्यात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज मुंबई पश्चिम उपनगर दौरा
राज ठाकरे आज मनसेच्या शाखांना देणार भेटी
शाखा नेटवर्किंग स्ट्राँग करण्याकडे ठाकरेंचा कल
