महाराष्ट्र
Sangli : राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं नाव अज्ञात व्यक्तींनी रातोरात बदलले
कारखान्याचं नाव रात्री अज्ञात व्यक्तीकडून बदलण्यात आलं
थोडक्यात
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं नाव बदललं
कारखान्याचं नाव रात्री अज्ञात व्यक्तीकडून बदलण्यात आलं
राजे विजयसिंह डफळे अस डिजीटल नाव दिलं
(Sangli) सांगलीत राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात बदलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काही अज्ञात व्यक्तींनी एका रात्रीत जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव बदलून त्या जागी 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
याच्याआधी काही दिवसांपूर्वी पडखळकरांनी कारखाना बंद पाडण्याचा इशारा दिला होता. नाव बदलेला फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे आता अनेक चर्चा रंगल्या असून यावर प्रतिक्रिया येत आहेत. हे नेमकं कोणी केलं आणि का? या तपास सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
