अमोल कोल्हे नथुराम गोडसेंच्या भूमिकेत; राजेश टोपे म्हणाले…

अमोल कोल्हे नथुराम गोडसेंच्या भूमिकेत; राजेश टोपे म्हणाले…

Published by :
Published on

राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे नथुराम गोडसेंची भूमिका साकारणार आहेत. याबाबत नुकतीच त्यांनी सोशल मिडीयावर माहिती दिली होती. व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हे यांची पाठराखण केली आहे.

व्हाय आय किल्ड गांधी' हा 45 मिनिटाचा सिनेमा आहे. तो प्रदर्शित होत आहे असं मला समजलं. अमोल कोल्हे आज मला भेटले. तासभर आमची चर्चा झाली. ते पुण्यात एक प्रकल्प राबवत आहे. त्यावर चर्चा झाली. त्यांनी मला एक क्लिप दाखवली. त्यात ते गोडसेची भूमिका साकारत आहेत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

अमोल कोल्हेंची खरी ओळख ही अभिनेता म्हणून आहे. ते लोकप्रिय आणि गुणी अभिनेते आहेत. अभिमान वाटावा असे कलाकार आहेत. त्यांची संभाजी मालिका सर्वजण पाहात असतात. अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. गोडसेंचा रोल केला असला तरी अभिनेत्याच्या अँगलने त्याकडे पाहिलं पाहिजे. ते कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पाहा, असं आवाहन टोपे यांनी केलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com