Rajgad
Rajgad

Rajgad : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! किल्ले राजगड, तोरणा, मढेघाट, धरण परिसर पर्यटनासाठी 'या' तारखेपर्यंत राहणार बंद

किल्ले तोरणा, राजगड, तसेच पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मढे घाट ह्या क्षेत्रात पर्यटनासाठी बंदी केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Rajgad) राजगड तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर 22 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत किल्ले तोरणा, राजगड, तसेच पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मढे घाट ह्या क्षेत्रात पर्यटनासाठी बंदी केली आहे. राजगड तालुक्यात जोरदार पाऊस आणि धुक्यांचे साम्राज्य पसरले आहे.

गडावर तसेच धबधब्यांच्या ठिकाणी निसरड्या वाटा , अरुंद रस्ते, कोसळणाऱ्या दरडींमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी या तालुक्यातील पर्यटनाला 30 सप्टेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे आदेश भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सारात यांनी दिले आहेत.

या परिसरात फलक लावण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com