Raju Shetti
Raju Shetti

Raju Shetti : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजू शेट्टी यांची कारखानदारांसमवेत बैठक

ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

  • आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजू शेट्टी यांची कारखानदारांसमवेत बैठक

  • बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष

(Raju Shetti) ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं असून याच पार्श्वभूमीवर ऊसदरासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजू शेट्टी, इतर शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात बैठक होणार आहे.

या बैठकीत काय चर्चा होणार तसेच काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कोणताही कारखाना सुरू होऊ दिला जाणार नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितले होते.

याच्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदारांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज ही बैठक होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com