nandurbar
nandurbarteam lokshahi

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या...

विविध आकारातील आकर्षक राख्या बाजारपेठेत दाखल राखी खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत मोठी गर्दी.
Published by :
Team Lokshahi

नंदुरबार: रक्षाबंधनला अवघे काही दिवस शिल्लक असताना नंदुरबार च्या बाजारपेठ्यांमध्ये आकर्षक अशा राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. व्यवसायिकांनी शहराच्या विविध भागात राखी विक्रीसाठी स्टॉल देखील सजवले आहेत. राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी होत असून विविध आकर्षक आकारातील आणि लहान मुलांसाठी विविध कार्टून असलेल्या राख्या बाजारपेठेत आल्या आहेत.

यावर्षी दोन रुपयापासून तर 5000 रुपयांपर्यंतची राखी विक्रीसाठी आली आहे. विशेषतः भगिनींकडून नवीन आकारातील राख्यांना अधिक पसंती दिली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात राखी खरेदीसाठी गर्दी होत असल्याने प्रशासनाच्या वतीने सुरक्षिततेच्या ही उपाययोजना केल्या जातात. एकूणच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये राखी खरेदी विक्रीतून मोठा आर्थिक व्यवहार होईल हे मात्र निश्चित.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com