वंचितच्या रमेश बारसकर यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले...

वंचितच्या रमेश बारसकर यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले...

वंचितच्या रमेश बारसकर यांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Published by :
Siddhi Naringrekar

वंचितच्या रमेश बारसकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रमेश बारसकर म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीसजी माळशिरसमध्ये आले होते. माळशिरसमध्ये आल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था या प्रश्नावर खऱ्या अर्थाने त्यांनी आवाज उठवला, भाषण केलं. मला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आव्हान या ठिकाणी करायचे आहे आपल्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था योग्य आहे की नाही. आपलं आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. कारण आपण या ठिकाणी आपल्या पक्षाचं खासदार, विद्यमान आमदार ज्यांच्यावर गुन्हेगारीचा आरोप आहे. ते आज फरार असताना देखील पोलिसांना ते सापडत नाहीत. पण तुमच्या खासदाराला आणि आमदाराला ते सापडतात.

अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था जर आपण ठेवली तर सर्वसामान्य, गोरगरिब, ओबीसी, दलित जनतेच या ठिकाणी काय होणार. माझा प्रश्न आहे. राज्यशाही गेली आणि लोकशाही आलेली आहे. या लोकशाहीमध्ये जर राज्यशाहीला आपण पोसत असाल तर सर्वसामान्य जनतेनं न्याय कुणाकडे मागायचा. आपण या ठिकाणी अशा प्रकारे रडीचा डाव खेळून, आपल्या हातामध्ये असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करुन आपण अशाप्रकारची निवडणूक जिंकून देखील आपण हरल्यासारखं होईल.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, म्हणून आपण ही निवडणूक लढवत असताना अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श घेऊन आपण निवडणूक लढवली असती तर अशाप्रकारची वेळ तुमच्यावर आली नसती. तुम्ही आदर्श कोणाचा घेतलेला आहे तर नरेंद्रजी मोदी आणि अमित शाहांचा आदर्श घेतलेला आहे. याच्याऐवजी आपण अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श घेऊन निवडणूक लढवली असती तर अशा गुन्हेगाराबरोबर आपल्याला मिलिभगत करावी लागली नसती. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com