रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले...

रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले...

रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीसा यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले की, आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. त्या विषयावर चर्चा करण्याकरता आणि मी खासदार झाल्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालक असतात त्यांना भेटायला आलो.

विकासकामांचे जे नियोजन आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी आलेलो होतो. आज जिल्ह्याची एवढी मोठी मिटींग आहे. असे श्यामकुमार बर्वे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com