Ratnagiri Gas Tanker Accident
Ratnagiri Gas Tanker Accident

Ratnagiri Gas Tanker Accident : हातखंबा येथे LPG गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात

रत्नागिरीजवळ LPG गॅसच्या टँकरला अपघात झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Ratnagiri Gas Tanker Accident)रत्नागिरीजवळ LPG गॅसच्या टँकरला अपघात झाला. पुलावरून हा टँकर खाली कोसळला आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर गॅस टँकरमधून गॅस लिक झाला. जवळच्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवलं असल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्हाधिकारी-जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून यांच्याकडून घटनेची पाहणी करण्यात आली. जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत वाहतूक पूर्ववत होणार नाही असे सांगण्यात आले आहे.

अपघातानंतर एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने गॅस गळती तात्पुरती थांबविली असल्याची माहिती मिळत आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प असून प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com