“राज्यात गुंडगिरी सुरूय, तत्काळ राष्ट्रपती शासन लावा”, आमदार रवी राणांची माहिती

“राज्यात गुंडगिरी सुरूय, तत्काळ राष्ट्रपती शासन लावा”, आमदार रवी राणांची माहिती

Published by :
Published on

भाजाप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन भाजप कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली होती.

यावर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. देशाचा स्वतंत्र दिवस मुख्यमंत्र्यांना माहिती नसतो. ते त्यांना पीएला विचारावं लागत. त्यामुळे आता जर बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांचे कान पकडले असते,असे राणा म्हणाले.

तर शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड ही गुंडगिरी सारखी आहे. शिवसेना गुंडगिरी करत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे आता राज्यात तत्काळ राष्ट्रपती शासन लावले पाहिजे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com