Ravindra Chavan : रविंद्र चव्हाण आज मराठवाडा दौऱ्यावर; पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ravindra Chavan) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आजोजन करण्यात आले आहे.
भाजपवर नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे.
Summary
रविंद्र चव्हाण आज मराठवाडा दौऱ्यावर
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित
भाजपवर नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार
