Ravindra Dhangekar : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. रविंद्र धंगेकर म्हणाले की, आज पुणेकर खऱ्या अर्थाने निवडणूक जिंकणार आहेत. जी निवडणूक पुणेकरांनी दोन महिन्यामध्ये हातामध्ये घेतली होती. काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, पुणेकरांवर विश्वास ठेऊन उमेदवारी माझी जाहीर झाली. या गल्लीने लहानाचा मोठा पुणेकरांनी केला. आज लोकसभेचं मी मतदान केलं. प्रचंड आनंद आहे. आज माझ्या स्वत: साठी मी मतदान करतो आहे. मी या गल्लीतून आता दिल्लीत जाणार. असे रविंद्र धंगेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com