Safest Banks India
Safest Banks India

Safest Banks: तुमचे पैसे कुठे सुरक्षित? RBIने सांगितली देशातील सर्वात सुरक्षित 3 बँकांची नावे

Safest Banks India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील तीन सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली असून SBI, HDFC आणि ICICI या बँकांना D-SIB श्रेणी दिली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भारतामध्ये अनेक बँका आहेत. यातील काही सरकारी बँका आहेत, तर काही खाजगी बँका आहेत. लोकांच्या मनात नेहमी आपल्या पैशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. याच पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील तीन सर्वात सुरक्षित बँकांची माहिती जाहीर केली आहे. या तिन्ही बँकांमध्ये पैसे असल्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे ही आरबीआयने सांगितले आहे.

Safest Banks India
Aadhaar Update: आधार अपडेट प्रक्रियेत मोठा बदल, आता केंद्रात न जाता घरी बसून पत्ता बदलणे होणार अधिक सोपे

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक, आणि ICICI बँक यांना डोमेस्टिक सिस्टिमिकली इम्पॉर्टंट बँक्स (D-SIBs) म्हणून ओळखले जाते. ज्या भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ आहेत. या बँका इतक्या मोठ्या आहेत की त्या कधीही बुडणार नाहीत. कारण अशा परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा संकटकाळ निर्माण होऊ शकतो. या बँकांच्या आर्थिक स्वास्थ्यावर देशाचा जास्त अवलंबून आहे.

Safest Banks India
EPFO Update: EPFO पगार मर्यादा वाढणार ₹३०,००० पर्यंत; कर्मचार्‍यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार

अनेक लोकांच्या मनात सरकारी बँका सर्वात सुरक्षित आहेत. पण रिझर्व्ह बँकेच्या या यादीत तीन पैकी दोन बँका खाजगी क्षेत्रातील आहेत हे महत्त्वाचे आहे. या तिन्ही बँकांचा देशाच्या जीडीपीमध्ये मोठा वाटा असून त्यांचे कामकाज थोडीशीही बाधित झाले. तर शेअर बाजार आणि सामान्य नागरिकांच्या पैशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकार आणि आरबीआयने या बँकांना आर्थिक संकट आल्यास तातडीने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरबीआयच्या नियमांनुसार, या तिन्ही बँकांना इतर बँकांपेक्षा जास्त रोख राखीव निधी किंवा भांडवल राखावी लागते. ज्याला ‘कॉमन इक्विटी टियर 1’ (CET 1) म्हणतात. हा निधी दिलासा म्हणून आर्थिक संकटाच्या वेळेला वापरला जातो, ज्यामुळे या बँकांच्या कामकाजावर किंवा नागरिकांच्या पैशांवर कोणताही परिणाम होत नाही. म्हणूनच या तिन्ही बँकांमध्ये पैसे ठेवणे सर्वात सुरक्षित मानले जाते.

Summary
  • आरबीआयने SBI, HDFC आणि ICICI या तिन्ही बँकांना सर्वात सुरक्षित म्हणून घोषित केले.

  • या बँकांना D-SIB म्हणजेच ‘सिस्टिमिकली इम्पॉर्टंट’ बँकांचा दर्जा आहे.

  • देशाच्या अर्थव्यवस्थेवर या बँकांचा मोठा प्रभाव असल्याने त्यांचे बुडणे अशक्य मानले जाते.

  • CET1 भांडवलामुळे या बँकांना संकटाच्या वेळीही स्थिरता टिकवता येते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com