Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar : कथित धमकी प्रकरणी अजित पवारांना दिलासा; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले समन्स रद्द

कथित धमकी प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ajit Pawar) कथित धमकी प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले समन्स रद्द करण्यात आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावाचे पाणी बंद करू," अशी कथित धमकी दिल्याप्रकरणी अजित पवारांना समन्स बजावण्यात आले होते.

हे समन्स बारामती सत्र न्यायालयाने रद्द केले असल्याची माहिती मिळत असून 2014मध्ये उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी बारामतीतील मासाळवाडी ग्रामस्थांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी आम आदमी पक्षाचे तत्कालीन उमेदवार व निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती.

या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जबाबांची पडताळणी करून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अन्वये चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. हा आदेश बेकायदा असून, अप्रमाणित पुराव्यांवर आधारित आहे, असा युक्तिवाद अजित पवारांच्या वकिलांनी केला. त्यानंतर सत्र न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा समन्स बजावण्याचा आदेश रद्द केला आहे.

न्यायालयाने अजित पवार यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 171 - सी (निवडणूक अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणे) आणि 171- एफ (निवडणुकीत दबाव टाकणे) अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे.

Summery

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले समन्स रद्द

  • कथित धमकी प्रकरणी अजित पवारांना दिलासा

  • "खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावाचे पाणी बंद करू," अशी कथित धमकी दिल्याप्रकरणी अजित पवारांना बजावले होते समन्स

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com