Vasant More
Vasant More

पुणे शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी; वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया

''आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा''
Published by :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेसा उघडपणे विरोध करणारे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांना पदावरून हटवण्यात आले आहे. मोरे (Vasant More) यांच्या जागी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्याकडे हे पद सोपवलं असून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांना नियुक्ती पत्र दिलंय. यानंतर आता वसंत मोरे (Vasant More) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबईमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पुण्यातील नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांना मनसेनं शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. आज साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्यासोबत काही निवडक अधिकारी राज यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी भेटीसाठी आले असता बाबर (Sainath Babar) यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचं पत्रक त्यांना देण्यात आलं.

“मी राज ठाकरे यांच्याकडून अकरा महिन्यांसाठीच शहरध्यक्षपद मागून घेतले होते. साईनाथ बाबर यांची निवड झाली आहे. मला अनेक पक्षांच्या ऑफर आहेत. मी मात्र मनसेतच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहीन,” असं म्हटलं आहे. मुंबईतील बैठकीला आपण उपस्थित नव्हतो असंही मोरेंनी (Vasant More) सांगितलंय.

तसेच वसंत मोरे (Vasant More) यांनी फेसबूक पोस्टही केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मावळ्यातल्या वेशातला फोटो पोस्ट करून भावनिक ओळी केल्या आहेत. "आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे " अशा आशयाचा संदेश लिहत, कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खुप खुप अभिनंदन साई... असे लिहत त्यांनी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांचे अभिनंदन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com