Naigaon News | राज्यात नेमकं चाललंय तरी काय? बदलापुरच्या घटनेची वसईत पुनरावृत्ती
बदलापूरमधील घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक आत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेचे सर्वच ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातीला आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. अशातच प्रकारची एक घटना वसई येथून समोर आली आहे. नायगाव येथील शाळेमध्ये 7 वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नायगाव मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील उपहागृहात काम करणार्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बदलापूर घटनेनंतर नायगाव पोलिसांनी प्रत्येक शाळेत good टच, बॅड टच हे आवेरनेश कॅम्प घेतले असता पीडित मुलींने आपल्या शिक्षिकेला ही घटना सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून, अल्पवयीन मुलाला अटक करून, रिमांड होममध्ये रवाना केले आहे.