Breaking : विधानभवन राडा प्रकरण; नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना 2 दिवसांचा कारावास आणि 2029 पर्यंत विधानभवनात बंदी घालावी अशी शिफारस
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. मुंबई अधिवेशनात झालेल्या राड्याचा अहवाल तयार झाला असून हा अहवाल आज पटलावर ठेवला.
विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल आज मांडला गेला. याच पार्श्वभूमीवर आता विधान भवनातील राडा प्रकरणी विधानसभेत अहवाल सादर करण्यात आला असून नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना दोन दिवसांचा तुरूंगवास द्यावा आणि 2029 पर्यंत विधानभवनात बंदी घालावी अशी शिफारस करण्यात आली आहे.
Summery
विधान भवनातील राडा प्रकरणी विधानसभेत अहवाल सादर
नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना दोन दिवसांचा तुरूंगवास द्यावा आणि 2029 पर्यंत विधानभवनात बंदी घालावी अशी शिफारस
विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल आज मांडला
