Irshalwadi Landslide
Irshalwadi LandslideTeam Lokshahi

मोठी बातमी! इर्शाळवाडी येथील रेस्क्यू ऑपरेशन प्रशासनाने थांबवले; अद्यापही काही जण बेपत्ता

Irshalwadi Landslide: अद्यापही इर्शाळवाडीत 57 जण अजूनही बेपत्ता आहेत. दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 27 वर गेला आहे.
Published by  :
Sagar Pradhan

खालापूर: इर्शाळवाडी येथे 19 जुलैच्या रात्री दरड कोसळ्यांने मोठी दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेत अनेक माणसे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. आज (दि.23) या घटनेच्या चौथ्या दिवशी देखील एनडीआरएफकडून शोधमोहीम सुरू ठेवली आहे. दरम्यान, आता या इर्शाळवाडीतील बचावकार्यबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारपासून रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Irshalwadi Landslide
Chitra Wagh On Kirit Somaiya: सोमैयांच्या व्हिडिओवर चित्रा वाघांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कुणी ताई...

बुधवारी रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळली. त्यात 48 पैकी 17 घरं गाडली गेली. त्यानंतर लगेचच म्हणजे गुरुवार पहाटेपासून बचावकार्याला सुरूवात झाली. आज बचावकार्याचा चौथा दिवस असून सकाळपासून दोन मृतदेह काढण्यात आलेत. दरम्यान दरड दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांना धीर देऊन त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं आहे. तर सोमवारपासून रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

दरम्यान, अद्यापही इर्शाळवाडीत 57 जण अजूनही बेपत्ता आहेत. दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 27 वर गेला आहे. आतापर्यंत अथक प्रयत्नानंतर 120 जणांना वाचवण्यात NDRFला यश मिळाले आहे. दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यातच दुसरीकडे या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनंत अडचणी येत आहेत. परंतु आता प्रशासनाने नातलगांना विचारूण ऑपरेशन उद्यापासून थांबवण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com