महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. न्या. आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. आनंद निरगुडे यांनी शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे.
मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने मागासवर्ग आयोग बरखास्त होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. याच्या आधी चार सदस्यांनी राजीनामा दिला असताना आता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने चर्चा रंगल्या आहेत.
निरगुडे यांचा राजीनामा मुख्य सचिव यांनी स्वीकृत केला आहे. त्या अनुषंगाने OBC मंत्रालयातील अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी पत्रकान्वये राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयास कळवले आहे.