महाराष्ट्र
मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. न्या. आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. आनंद निरगुडे यांनी शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज्य मागासवर्गाच्या अध्यक्षपदावर मुंबई न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांचा राजीनामा काल झाल्यानंतर सरकारने शुक्रे यांची तात्काळ नियुक्ती केली.
प्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिंद्र तांबे यांची सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली. मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष निरगुडे यांच्या राजीनामा नंतर काल मोठी खळबळ उडाली होती.