KolhapurTeam Lokshahi
महाराष्ट्र
विधवा महिलांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतीचा क्रांतीकारक निर्णय
विधवांना धार्मिक कार्यात सहभाग करुन घेणार
कोल्हापूर
सती प्रथा बंद झाल्या असल्या तरी पतीच्या निधनानंतर आजही काही भागात महिलांची आभूषणे काढणे, कुंकू पुसणे,बांगड्या फोडणे,धार्मिक कार्यात सहभाग करून न घेणे आशा प्रथा सुरूच आहेत. मात्र शिरोळ तालुक्यातील हेरवाड (Herwad) गावाने या प्रथा बंद करण्याचा ठरावं करत पुढचे पाऊल टाकले आहे.
विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलेले पाऊल हे खरोखर कौतुकास्पद आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून हे चळवळीचे लोण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पसरणार आहे. लवकरच शिरोळ (Shirol) तालुक्यातील सर्व सरपंचांची या विषयावर कार्यशाळा आयोजित करून संपूर्ण शिरोळ तालुका विधवा प्रथामुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असल्याचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितले. तर गावातील महिलांनी याचे स्वागत केले