देवगड तालुक्यातील फणसगाव – महाळुंगे रस्त्यावर रास्ता रोको

देवगड तालुक्यातील फणसगाव – महाळुंगे रस्त्यावर रास्ता रोको

Published on

सिंधुदुर्ग : समीर म्हाडेश्वर | देवगड तालुक्यातील फणसगाव वरुन म्हाळुंगेकडे जाणाऱ्या मार्गावर मोठया प्रमाणात चिरे भरुन जाणारी अवजड वाहने जातात. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होत आहे. असा आरोप करीत येथिल नागरीकांनी या मार्गावरील वाहतूक रास्तारोको करून बंद केला आहे.

दरम्यान हा मार्ग गेली अनेक वर्षे नादुरुस्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने नाईलाजास्तव रस्ता रोको केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र यानंतर तातडीने खान मालकांचे प्रतिनिधी दिनेश नारकर यांनी आंदोलन ठिकाणी येऊन रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करतो असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या मार्गावर रास्तारोकोमुळे चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी रास्तारोको आंदोलनात म्हाळुंगे सरपंच संदीप देवळेकर, उपसरपंच साक्षी तावडे दीपक परब, संदीप राणे, प्रकाश राणे, सामाजिक कार्यकर्ते महेश नारकर, उदय पाटील, रामकृष्ण राणे, ग्रामपंचायत सदस्यासह नागरीक व महिलावर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com