महाराष्ट्र
नवी मुंबईतल्या साई-साक्षी बारमध्ये दरोडा… पोलिसांच्या वेशात चोरट्यांनी साधली संधी!
परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. 100 कोटींचं टार्गेट प्रकरण गाजत असातनाच महाराष्ट्रात पुन्हा एक प्रकरण उघडकीस आलंय. नवी मुंबईतील साई-साक्षी हॉटेलवर 4 अज्ञातांनी दरोडा टाकत जबरी चोरी केल्याची घटना समोर आली. विशेष म्हणजे हे चोर पोलिसांच्या वेशात आले होते.
यावेळी त्यांनी 60 हजारांची रोख आणि 16 हजारांचे मोबाईल लंपास केल्याची तक्रार बार मालकाने दिली आहे. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
या ठिकाणाहून बार कलेक्शन चालत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच चोरांना पोलिसांनीच टीप दिल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.