Pune Rave Party : Rohini Khadse : पुणे रेव्ह पार्टी प्रकरण; रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
(Pune Rave Party) पुण्यातील रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांची रात्री साडेतीन वाजता छापा टाकला. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारीमध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील होते. रेव्ह पार्टी सुरु असलेल्या फ्लॅटमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे म्हणाले की, 'कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल' अशी त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.