Rohit Arya Case
Rohit Arya Case

Rohit Arya Case : Deepak Kesarkar : रोहित आर्य प्रकरण; माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार

पवई परिसरात रोहित आर्यने 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • मुंबईतील पवई परिसरात रोहित आर्यनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं

  • माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार

  • रोहित आर्यने दीपक केसरकरांशी बोलण्याची मागणी केल्याची माहिती

(Rohit Arya Case) मुंबईतील पवई परिसरात एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं होतं. रोहित आर्य असे त्या व्यक्तीचं नाव होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तातडीने कारवाई करत काही तासांतच सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. त्याने सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. पोलीस स्टुडिओच्या बाथरूममधून आत शिरले. यावेळी रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत आरोपी जखमी झाला. आरोपीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Rohit Arya Case
Rohit Arya Case : 'रोहित आर्य प्रकरणी अहवाल सादर करा'; राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश

याच प्रकरणी आता माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. रोहित आर्यने दीपक केसरकरांशी बोलण्याची मागणी केल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com