Rohit Pawar : माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Rohit Pawar ) विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात कामकाज सुरु असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रम्मी हा पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी शेअर केला होता. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हे आदेश काढले असून येत्या 9 तारखेला रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
Summery
रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने काढले आदेश
पवार यांनी कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतांनाचा व्हिडीओ केला होता ट्विट
