Bihar Election Result
Bihar Election Result

Bihar Election Result : 'जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव...'; बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकालावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया

बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...

(Bihar Election Result ) बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. विधानसभा निवडणुकीचं मतदान हे दोन टप्प्यात 6 आणि 11 नोव्हेंबरला पार पडले. 243 जागांपैकी 122 जागांवर बहुमत आवश्यक आहे. बिहारमध्ये दोन्ही टप्प्यात विक्रमी मतदान झालेले पाहायला मिळाले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सनुसार NDA युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एनडीएची बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होताच संपूर्ण देशाचे लक्ष या राजकीय लढतीकडे वळले आहे. सुरवातीच्या ट्रेंड्सनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. त्या खालोखाल जनता दल (युनायटेड) म्हणजेच JDU दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातच आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, "हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. #EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला. आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र #बिहारचुनाव दरम्यान निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की!"

"महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो.असो, ही निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे.@TejashwiYdvRJD यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही." असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Summery

  • बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात

  • निवडणुकीचा निकालावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

  • 'जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com